पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी माधुरी अजित कासुर्डे यांची निवड
पाचगणी : पाचगणी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका माधुरी अजित कासुर्डे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले.
माधुरी कासुर्डे या प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आल्या असून नगरपरिषदेतील विविध विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पाचगणी शहराच्या विकासाला त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





