Home » राज्य » प्रशासकीय » पांचगणीत कामगार दिनी महाराष्ट्र दिनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना जॅकेट-कॅपचे वितरण

पांचगणीत कामगार दिनी महाराष्ट्र दिनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना जॅकेट-कॅपचे वितरण

पांचगणीत कामगार दिनी महाराष्ट्र दिनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना जॅकेट-कॅपचे वितरण

पाचगणी प्रतिनिधी -महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने पांचगणी नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता कर्मचाऱ्यांना जॅकेट व कॅपचे वितरण करण्यात आले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

हिलदारी प्रकल्पांतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये आरोग्य तपासणी, शासकीय योजनांचा लाभ, सेफ्टी गियर उपलब्धता, प्रशिक्षण इत्यादींचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना जॅकेट व कॅपचे वितरण करण्यात आले. यामुळे त्यांच्या कामात सुसूत्रता, सुरक्षितता आणि सन्मान वाढण्यास मदत होणार आहे.

हा कार्यक्रम पंचगणी नगरपरिषद कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचगणीचे नगराध्यक्ष मा. दिलीपभाऊ बागडे, मुख्याधिकारी मा. पंडित पाटील तसेच सर्व नगरसेवक यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना जॅकेट व कॅप प्रदान करण्यात आले.

या उपक्रमासाठी आरोग्य सभापती मा. राजश्री सानस यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, सिटी कोऑर्डिनेटर श्री. ओंकार ढोले व हिलदारी प्रकल्पातील टीम सदस्य यांचे सहकार्य लाभले.या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढण्यास तसेच पांचगणी शहर अधिक स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket