Home » राज्य » पर्यटन » पहलगाम हल्ल्याचा बदला! भारतीय जवानांच्या शौर्याचा महाबळेश्वरमध्ये विजयोत्सव

पहलगाम हल्ल्याचा बदला! भारतीय जवानांच्या शौर्याचा महाबळेश्वरमध्ये विजयोत्सव

पहलगाम हल्ल्याचा बदला! भारतीय जवानांच्या शौर्याचा महाबळेश्वरमध्ये विजयोत्सव

महाबळेश्वर (प्रतिनिधी):पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र बदला भारतीय जवानांनी पाकिस्तानात घुसून घेतल्याच्या वृत्तानंतर महाबळेश्वर शहरात महायुतीच्या वतीने आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीतील नऊ दहशतवादी ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक करून तेथे लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आल्यानंतर हा जल्लोष करण्यात आला. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या विजयी कारवाईच्या आनंदप्रीत्यर्थ महाबळेश्वर शहरात शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू, रविभाऊ कुंभारदरे, संजय जंगम, सतीश ओंबळे, सुनील ढेबे, संदेश भिसे, राजु भाऊ पवार, गोविंद कदम, ओमकार दीक्षित, दिनेश भिसे, रामदास जाधव, नाना कदम, चिन्मय आगरकर, उस्मान खारखंडे, सतीश लोखंडे, अशोक शिंदे, वृषाली डोईफोडे, उषा ओंबळे, प्रभा नायडू, फौजीया मुलानी, विजय चोरघे, तुषार डोईफोडे, अमोल साळुंखे, हर्ष साळुंखे, ओम नायडू, श्लोक नायडू, किरण मोरे, रमेश चौधरी यांच्यासह महाबळेश्वरमध्ये आलेले पर्यटक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थितांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत आसमंत दणाणून सोडला. तसेच, एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. भारताला पंतप्रधान मोदींच्या रूपाने एक सक्षम आणि कणखर नेतृत्व मिळाले आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करून भारतीय जवानांनी देशाची मान उंचावली असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले. या विजयोत्सवामुळे महाबळेश्वर शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (रोहास), जिल्हा

Live Cricket