श्री.फरोख कूपर यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. रामचंद्र व डॉ. सुनिता गोडबोले या दाम्पत्याचा जाहिर नागरी सत्कार
सातारा -सातारचे सुपुत्र डॉ.रामचंद्र गोडबोले व त्यांच्या पत्नी डॉ सुनिता गोडबोले यांना भारत सरकारने पद्मश्रीचा सन्मान देऊन त्यांच्या वर्षानुवर्षे निस्वार्थ सामाजिक क्षेत्रातील वैद्यकिय सेवेचा गौरव केला आहे. या औचित्याने सर्व सातारकर व चिमणपुरा वासीयांच्या वतीने जाहिर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
हा सत्कार समारंभ श्री फरोख कूपर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कूपर उद्योग समूह यांच्या हस्ते संपन्न झान्ना सदर सत्कार समयी श्री फरोख कूपर यांनी डॉ. गोडबोले दाम्पत्याचे त्यांच्या सामाजिक वैद्यकिय सेवेचे मनापासून अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या समाजसेवी कार्यासाठी रक्कम रू.५ लाख आर्थिक मदत देण्याचे जाहिर केले.
डॉ. गोडबोले यांचे जीवन हे सेवा हा विचार आणि माणसासाठी माणूस म्हणून जगण्याची तत्वज्ञानात्मक भूमिका तसेच शिक्षण हे केवळ उपजिवीकेचे साधन न राहता आयुष्यभराची साधना असेल, हि जाणीव जोपासून त्यांनी समाजासाठीचा अविरत सेवाभाव ठेवला देशाच्या दुर्गम वनवासी भागात वैद्यकिय सेवेची ग्यरी गरज आहे आणि आपल्या हातून हे कार्य घडू शकते या विश्वासाने हे दाम्पत्य छत्तीसगड मधील अतिदुर्गम भागात नक्षलवादी सावली, जंगली पाण्यांचे भय, पायाभूत सुविधांचा अभाव अशा अप्रतिकूल परिस्थितीत “वनवासी कल्याण आश्रम” च्या माध्यमातून आदिवासी लोकांसाठी वैद्यकिय सुविधा गेले ४० वर्षापासून देत आहेत. “तु मे एक रक्त” या विचारातून आदिवासी व दुर्गम भागातील समाजाला शहरी समाजाशी जोडून हे घटक दोन वेगळे नसून एकाच भारतीय संस्कृतीचे एकाच रक्ताचे घटक आहेत.
हि जाणीव त्यांनी जगण्यातून दाखवली व कधीही पुरस्कार नको म्हणत राहिले तरीही त्यांचा या अधिरत सेवा कार्याने “नको नको म्हणताना, गंध गेला रानावना…” हे या गोडबोले दाम्पत्याचा संपूर्ण जीवनप्रवासाचे सार आहे.
डॉ. गोडबोले दाम्पत्य आदिवासी समाजातील आरोग्य सेवेपुरतेच न थांबता त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी वसतीगृह सुरू केले, कुपोषणा विरूद्ध सातत्याने काम केले, महिलांसाठी स्वयंसेवी गट उभे केले. याचे आपल्या सर्व सातारकर वासीयांना कौतुक व सार्थ अभिमान असून सदर सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी हा जाहिर नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला या समयी श्री अमोल माहिते -नगरसेवक आणि नियोजन मा. नगरसेवक इतर सातारा शहर नगराध्यक्ष, सी मुक्ता लेवे नगरसेविका, श्री अशोक शेडगे सभापती, श्री. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, श्री. वसंत (अण्णा) लेवे मान्यवर व सातारा व चिमणपुरा पेठ नागरीक उपस्थित होते.




