Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » पाचगणीच्या श्री घाटजाई पतसंस्थेचा राज्यस्तरावर गौरव; ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार प्राप्त

पाचगणीच्या श्री घाटजाई पतसंस्थेचा राज्यस्तरावर गौरव; ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार प्राप्त

पाचगणीच्या श्री घाटजाई पतसंस्थेचा राज्यस्तरावर गौरव; ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार प्राप्त

पांचगणी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२५-२६ चा ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार पाचगणी येथील श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्था यांना प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेला हा सन्मान देण्यात आला.

या पार्श्वभूमीवर पाचगणीत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे सहकार निवडणूक आयुक्त अनिल काकडे, मुंबई जिल्हा बॅंकेचे जेष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष, संचालक, पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आयोजित या कार्यशाळेत राज्यभरातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

कार्यशाळेत सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध बँकांचे संचालक आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सहकार व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध पतसंस्थांना ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पाचगणीचे माजी नगराध्यक्ष व संस्थापक नानासाहेब कासुर्डे, सेक्रेटरी तानाजी भिलारे, उपाध्यक्ष रमेश खरात, संचालक सचिन वाडकर, सुनील गोळे, अविनाश माने, लक्ष्मण टेके, मॅनेजर विक्रम पोरे, शेख मॅडम, कल्याणी मोरे तसेच संचालक प्रा. सौ. वर्षा सागर कासुर्डे यांनी पुरस्कार स्वीकारला.

या कार्यक्रमास राज्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे सदस्य, अधिकारी व सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. श्री घाटजाई पतसंस्थेला प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे संस्थेच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेतली गेल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket