पाचगणीत चर्चेजवळ झाड कोसळले; हॉटेल माउंट कॅसल परिसरात अनेक वाहनांचे नुकसान

पाचगणी : पाचगणी शहरातील हॉटेल माउंट कॅसलजवळील चर्च परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली. झाड रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर पडल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे काम सुरू केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाल्याने वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.





