Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वसंतगड, कराड येथे प्रधानमंत्री पिकविमा योजना कार्यशाळेचे आयोजन

वसंतगड, कराड येथे प्रधानमंत्री पिकविमा योजना कार्यशाळेचे आयोजन

वसंतगड, कराड येथे प्रधानमंत्री पिकविमा योजना कार्यशाळेचे आयोजन

दि. 6 जुलै 2024 रोजी कृषी महाविद्यालय, कराड येथील कृषिदुतांमार्फत ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वसंतगड येथे प्रधानमंत्री पिकविमा योजना कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कराड आणि शासकीय कृषि महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या सुरुवातीस डॉ. अजित पवार, रेठरे यांनी कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना 1 रुपया मध्ये पीक विमा कसा काढायचा यासंबंधी माहिती दिली. त्याबरोबरच रासायनिक शेती पेक्षा जैविक शेती कशी उपयोगी ठरेल याचे धडे शेतकऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यामागचा उद्देश जसे पिकांत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार, पिकांच्या उत्पादनातील जोखीम, विविधीकरण आणि कृषीक्षेत्राचा विकास करणे असे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे.

पीक विम्या मध्ये पुढील प्रकारे नुकसान भरपाई मिळेल असे डॉ. अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. 

 हवामान घटकांचा प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी न झाल्यामुळे होणार नुकसान

पीके पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीतील नैसर्गिक आपत्ती, वीज कोसळणे, गारपीट इ.

वादळ, चक्रीवादळ, पुरामुळे पीकक्षेत्र जलमय होणे (भात, ऊस व ताग पीक वगळून)

भुस्खलन, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोग आदी बार्बीमुळे उत्पन्नात होणारी घट

 स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान इ. घटकांचा समावेश असेल.

त्यानुषंगाने अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेऊन आपले आर्थिक नुकसान टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यशाळेस वसंतगड येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. रघुनाथ नलवडे, शांताराम कदम, मोहिते सर, कृषि विभागातील श्रीमती. साळुंकी मॅडम, शिंदे मॅडम, संतोष काळे आणि 80 प्रगतशील, युवा शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच कृषी महाविद्यालय, कराडचे कृषिदूत व कृषिकण्या देखील उपस्थित होत्या. सदर कार्यशाळा कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी श्री. सुशांत भोसले आणि कृषि महाविद्यालय, कराड येथील ग्रामिण कृषि कार्यानुभवचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल अडांगळे, डॉ. अर्चना ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबाविण्यात आली. असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास कृषि महाविद्यालय, कराडे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील यांचे विशेष मागदर्शन लाभत आहे. तसेच अधिष्ठाता प्रतिनीधी डॉ. सतीश बुलबुले, केंद्रप्रमुख डॉ. राणी निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र हसुरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल अडांगळे आणि डॉ. अर्चना ताठे तसेच सर्व विषयतज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल अडांगळे, डॉ. अर्चना ताठे आणि कृषि विभागातील साळुंखी मॅडम, शिंदे मॅडम, संतोष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket