कृषीदुतांची वारुंजी येथे मासिक बैठकीचे आयोजन
मुंढे : ता. 23 जुलै 2024: कराड तालुक्यातील सुपणे, वसंतगड, वारुंजी आणि मुंढे येथे मागील महिन्यापासून सुरू असलेल्या ग्रामीण कृषीजागृती व कृषी औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, कराड येथील कृषीदुतांची मासिक बैठक पार पडली.
सदर बैठकीत विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय स्तरावर पीक निहाय नवीन तंत्रज्ञान व त्यासंबंधी कौशल्य प्रत्यक्षिकामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, पर्यावरण पूरक व हवामान अनुकल अशा शाश्वत पीक उत्पादन पद्धती चालना देणे, सुधारित व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना उद्युक्त करणे, प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाद्वारे पिकावरील विविध किडी रोग त्यावरील मित्र कीटक व त्यांचे शेतीतील महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देणे, पिकाच्या मूल्य साखळीची शेतकऱ्यांना माहिती तयार करून देणे, रोग व किडीचा पिकावरील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पीक उत्पादन प्रक्रिया, बाजारमूल्य संबंधित शासकीय व विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवावे अशा विविध उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी सहयोगी अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. सतीश बुलबुले, केंद्र प्रमुख डॉ. राणी निंबाळकर कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र हसुरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील अडांगळे, डॉ. अर्चना ताठे आणि सर्व विषयतज्ञ तसेच कृषीकन्या आणि कृषिदूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील अडांगळे तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी कु. संचिता भोसले हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वारुंजी येथील कृषीकन्या कु. भक्ती औताडे, शितल बनसोडे, संचिता भोसले, अश्विनी कदम, प्रिया कांबळे, मयुरी माने, प्रियांका नागणे यांनी परिश्रम घेतले.