शिरवळ येथे शनिवार शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
सातारा दि.12:महाराष्ट्र शासनाच्या गतीमान प्रशासन अंतर्गत महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शिरवळ ता.खंडाळा येथे शनिवार दि.14 मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दिवंगत तुकाराम कबुले सभागृह, केदारेश्वर मंदिरा शेजारी खंडाळा तहसील विभागाकडून व शिरवळ मंडलातील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती वाई प्रातांधिकारी डॉ.योगेश खरमाटे, खंडाळा तहसीलदार सुहास थोरात यांनी दिली.
या अभियानातंर्गत प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, जात आणि रहिवासी प्रमाणपत्र, तसेच घररपट्टे वाटप, अशा विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात येणार आहेत. सदर शिबीरामध्ये खंडाळा मंडळातील सर्व गावांच्या खातेदारांना ७/१२ मधील त्यांच्या दुरुस्ती करून घेणेसाठी विहीत नमुन्यात अर्ज करता येणार आहेत. मयत खातेदारांच्या वारसांना वारस नोंदी करून घेणे करीता अर्ज सादर करता येयार आहे, एकुमँ शेरा कमी करून फेरफारा मधील वारसांना त्यांची नावे ७/१२ सदरी दाखल करून घेता येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. अकृषीक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणांची माहिती दिली जाणार आहे. सामाजीक अर्थसाह्य योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अँग्रीस्टॅक व पी.एम.किसान योजनेअंतर्गत शिल्लक खातेदारांची नोंदणी केली जाणार आहे. पुरवठा विभागाकडून दुबार रेशन कार्ड दिली जाणार असून नाव कमी करणे व नाव वाढवणे आदी कामे केली जाणार आहेत. खंडाळा मंडळातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढून प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त लोकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार हेमंत कामत, शिरवळ मंडल अधिकारी एम. आर. डोईफोडे, शिरवळ मंडलातील ग्राम महसूल अधिकारी यांनी केले आहे.




