सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » ठळक बातम्या » कराडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ९ ते १५ एप्रिलदरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

कराडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ९ ते १५ एप्रिलदरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कराड येथे ९ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन -जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले यांची माहिती

कराड प्रतिनिधी –कराड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचे जय्यत तयारी झाली असून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले यांनी दिली संपूर्ण देशभरात भिमसैनिकांना जयंतीची उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच कराड शहरातील भिमसैनिक सुद्धा जयंती उत्सवाच्या कामात व्यस्त आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटी, कराड यांच्या वतीने गुरुवार दिनांक ९ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक श्री. राहुल भोसले व उपाध्यक्ष श्री. सुदेश थोरवडे यांनी दिली.

गुरुवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. दिनांक १० एप्रिल सकाळी ११ ते ४ पर्यंत भव्य रक्तदान शिबीर व रक्तदात्यास भेट वस्तू दिली जाणार आहे. व सायंकाळी ७.३० वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असून त्यानंतर क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने फुले नगर येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११.३० वाजता आरोग्य शिबीर व सायंकाळी ७.३० वाजता अंधश्रध्दा निर्मूलनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.

दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मा. प्रदीप बनसोडे यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. तर रात्री ८ वाजता भीम गितांचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दांडपट्टा तर रात्री ११.५९ मिनिटांनी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती उत्सव कमेटीच्या वतीने व बौध्द समाज तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे. व तदनंतर पारंपारिक पध्दतीने भजन गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ तेलचित्रांचे प्रदर्शन व दुपारी ३ वाजता मानाचा घोड्याच्या लिलाव होऊन सायंकाळी ५ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक विविध वाद्यांचा व चित्ररथांच्या सहभागाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा फुले चौक एसटी स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक ते आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा ते स्व.पी.डी.पाटील साहेब यांच्या घरापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यत मिरवणूक निघणार आहे. तसेच दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता भव्य डान्स स्पर्धेचेही आयोजन केले आहे. तरी दिनांक ९ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत आयोजित केलेल्या कार्यक्रमास कराड शहरातील व उपनगरातील सर्व बहुजन बांधवांनी सहभागी होऊन जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket