अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरमध्ये २५ रोजी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन

महाबळेश्वरमध्ये २५ रोजी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन

महाबळेश्वरमध्ये २५ रोजी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन

महाबळेश्वर  (प्रतिनिधी) -जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व मसल फॅक्टरी महाबळेश्वर यांच्या वतीने सलग सहाव्या वर्षी ‘महाबळेश्वर श्री २०२६’ या शरीरसौष्ठव व मेन्स फिजिक्स स्पर्धेचे आयोजन दि. २५ रोजी सायंकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात करण्यात आले आहे. स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागाची संधी देण्यात आली आहे. स्पर्धेत महाबळेश्वर श्री २०२६ चा मान पटकावणार्या स्पर्धकास ११ हजार १११, उपविजेता २ हजार २२२, बेस्ट पोझर २ हजार २२२, तर बेस्ट मस्क्युलर : २ हजार २२२ रुपये मिळणार आहेत.

प्रत्येक वजन गट व पारितोषिके (प्रत्येक गटासाठी) ५० ते ५५ किलो गट, ५५ ते ६० किलो गट, ६० ते ६५ किलो गट, ६५ ते ७० किलो गट, ७० ते ७५ किलो गट, ७५ ते ८० किलो गट, ओपन गट (८० किलोवरील). मेन्स फिजिक्स गट व प्रत्येक गटासाठी पारितोषिके : प्रथम क्रमांक : ४ हजार, द्वितीय क्रमांक ३ हजार, तृतीय क्रमांक : २ हजार ५००, चतुर्थ क्रमांक २ हजार, पाचवा क्रमांक एक हजार, तर सहाव्या क्रमांकास प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे. नागरिकांनी स्पर्धेस उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket