कृषि महाविद्यालय, कराड येथे कृषिदूतांसाठी ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
दिनांक : ०५ जुलै, २०२४ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी आणि ग्रेप मास्टर ॲप, नाशिक यांच्यामधील सामंजस्य करार (MOU) नुसार कृषि महाविद्यालय, कराड येथे शेवटच्या वर्षातील ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत विविध गावात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि. ०५ जुलै, २०२४ रोजी ऑनलाइन कार्यशाळा संपन्न संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रेप मास्टर- ऑल क्रॉपचे संचालक श्री. सुनिल शिंदे यांनी कंपनीचे शेतकऱ्यांसाठी कामाचे स्वरूप सांगून या ॲप मार्फत शेतकऱ्यासाठी ऑनलाईन सल्लासेवा कशाप्रकारे दिली जाते यावर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यानी या ॲपच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकरी बांधवापर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर श्री. गणेश रुमे यांनी ग्रेप मास्टर ॲप कसे वापरावे यावर प्रत्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमधून विद्यापीठाचे संशोधन, नवीन वाण आणि वेगवेगळे ॲप शेतकरी बांधवापर्यंत पोहचवायचे आहेत तसेच विद्यार्थी यांना आधुनिक शेती, नवीन तंत्रज्ञान आणि यांची ओळख आणि नवनवीन डिजिटल कौशल्य आणि आत्मविश्वास या गुणाची वाढ होण्यासाठी आजची कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ऑनलाइन कार्यशाळेस प्राध्यापक, विद्यार्थी यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. सदर कार्यशाळा डॉ. शिवाजी पाटील, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, कराड यांच्या मार्गदर्शनखाली राबविण्यात आली. अधिष्ठाता प्रतिनीधी डॉ. एस. व्ही बुलबुले, केंद्रप्रमुख डॉ. राणी निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र हसुरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल अडांगळे आणि डॉ. अर्चना ताठे तसेच सर्व विषयतज्ज्ञ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल अडांगळे, डॉ. अर्चना ताठे आणि ग्रेप मास्टर ॲप, नाशिकचे चैताली पगार यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन डॉ. सुनिल अडांगळे यांनी केले.