एक लाख वृक्ष लागवड मोहिमेला पाचगणी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्ते प्रारंभ
पांचगणी प्रतिनिधी : प्रेरणा, जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्यावतीने एक लाख वृक्ष लागवडीच्या यंदाच्या उपक्रमाला मुख्याधिकारी निखिल जाधव पाचगणी यांच्या हस्ते प्रारंभ झाला़.
‘पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याने पर्यावरणाचा -हास होऊ नये व निसर्गाचे संरक्षण व्हावे यासाठी संस्थेच्या वतीने एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी दिली.
यावेळी पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्ते एक लाख वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमा वेळी उपस्थित पाचगणी पोलीस निरीक्षक दिलीप पवार संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे,प्रदीप बेलोशे गणेश कासुर्डे,प्रमोद गौतम आनंदा निंबाळकर योगेश जाधव प्रवीण पवार त्याचप्रकारे मीनलबेन मेहता कॉलेज येथील सर्व प्राध्यापक प्राचार्य व एम एस सी बी येथील सर्व वरिष्ठ अधिकारी इतर सर्व संस्थेचे सदस्य कार्यक्रमा वेळी उपस्थित होते.