अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्कर्ष पतसंस्थेतर्फे देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफल उत्साहात संपन्न

स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्कर्ष पतसंस्थेतर्फे देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफल उत्साहात संपन्न

स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्कर्ष पतसंस्थेतर्फे देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफल उत्साहात संपन्न

वाई : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या गौरवशाली पर्वानिमित्त उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला देशभक्तीपर गीतांचा भव्य सांगीतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, मधली आळी, वाई येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिक व संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना संगीतमय मानवंदना अर्पण करण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी संपूर्ण सभागृह राष्ट्रप्रेमाच्या वातावरणाने भारावून गेले.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सागर वैराट व त्यांच्या टीमने एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गायिका तेजस्विनी पोरे व गायिका प्रियांका कदम-भिलारे आणि डॉ. शस्मिता जैन यांनी आपल्या सुरेल गायनातून कार्यक्रमात विशेष रंगत आणली. प्रीती कोल्हापुरे यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी सूत्रसंचालनातून कार्यक्रमाची रंगत वाढवली. लाईव्ह बँडच्या साथीने सादर झालेल्या देशभक्तीपर गीतांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

आर्थिक क्षेत्रातील विश्वासार्ह सेवेसोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी असलेली नाळ अधिक दृढ करण्याचा उत्कर्ष पतसंस्थेचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. त्याच सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाभिमानाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. अनुराधा आनंद कोल्हापुरे, उपाध्यक्ष श्री. ॲड. रमेश यादव यांच्यासह संचालक श्री.अमर कोल्हापुरे, , श्री मदन साळवेकर, डॉ. मंगला अहिवळे, श्री श्रीकांत शिंदे, श्री शरद चव्हाण, श्री सलीम बागवान, श्री संजय वाईकर, श्री सागर मुळे, श्री वैभव फुले, श्री.भूषण तारू, श्रीमती.नीला कुलकर्णी, श्रीमती.अलका घाडगे तसेच संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, हितचिंतक व वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“सूर देशभक्तीचे… स्वर राष्ट्रप्रेमाचे… आणि मानवंदना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला!” या भावनेतून रंगलेल्या या सुरेल मैफलीने उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची भावना जागवली. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भारावलेल्या वातावरणात या देशभक्तीपर सांगीतिक सोहळ्याची सांगता झाली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket