रविवारी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर क्लब सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिमझिम के तराने ‘ या कराओके कार्यक्रमा चे आयोजन
दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर क्लब सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिमझिम के तराने ‘ या कराओके कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ श्याम बडवे, मुकुंद फडके,शिरीष चिटणीस आणि विजय साबळे उपस्थित राहणार आहेत.
या कराओके कार्यक्रमात गायक विजय साबळे,शिरीष खुटाळे, डॉ हेमंत मांडवे, सचिन शेरकर, चंद्रशेखर बोकील, डॉ सुहास पाटील,शिवकुमार,मंजुषा पोतनीस, मीनाक्षी मांडवे, स्मिता शेरकर,ममता नरहरी, कविता शिवकुमार, श्रुती बेंद्रे, दिपाली घाटगे, कला चंद, तरन्नुम शेख, सुनीता किर्दत, सुवर्णा लखापती गाणी सादर करणार आहेत.
निर्मिती -संकल्पना.. विजय साबळे यांची असून दिपाली गिते सूत्रसंचालन करणार आहेत.ध्वनी व्यवस्था :अक्षदा शेवडे यांची असून हा कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल मध्ये उद्या दिनांक २६ जुलै 2026 रोजी सायंकाळी ५.४५ ते ८.३० या वेळेत सादर होणार असून आपण होणाऱ्या सुमधुर गाण्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.





