अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी कार्यालयात तक्रार निवारण समिती आवश्यक

महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी कार्यालयात तक्रार निवारण समिती आवश्यक

महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी कार्यालयात तक्रार निवारण समिती आवश्यक

सातारा दि. १५ – महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ज्या आस्थापनामध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी आहेत अशा कार्यालयांमध्ये अधिनियम 2013 मधील कलम 4 नुसार अंर्तगत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. जिल्हयात कार्यरत सर्व आस्थापनांनी शासनाच्या SHE BOX PORTAL वरती नोंदणी करणेबाबत आदेशित केलेले आहे आणि आपले कार्यालयाचे नोंदणी झाल्यानंतर आस्थापनेच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची संपूर्ण माहिती सदर पोर्टलवरती अदयावत करावयाची आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील कलम 19 अन्वये आपण आपले कार्यालयात कामकाज करणा-या महिलांना सुरक्षित व अनुकूल वातावरण पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी कार्यालय प्रमुखाची आहे. याअनुषंगाने कार्यालयाची नोंदणी व अंतर्गत तक्रार निवारण समितीची माहिती SHE BOX PORTAL वर अदयावत करणे अधिनियमांतर्गत बंधनकारक आहे. ज्या आस्थापना अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करणार नाहीत अशा शासकिय व खाजगी आस्थापनांना सदर अधिनियमात अतंर्भुत असलेल्या कलम २६ (१) प्रमाणे कार्यालय प्रमुखास व खाजगी आस्थापनांच्या प्रमुखास (मालकास) रक्कम रु. ५०,०००/- रूपयापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.

सूचना देऊन ही अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन केली नसल्यास खाजगी आस्थापनाच्या प्रमुखांना (मालकांना) या कायदयातील कलम २६ (२) नुसार परवाना रदद करुन दुप्पट दंडाची तरतुद करणेत आलेली आहे. तरी पुढील कार्यवाही टाळण्याकरीता, आपण तात्काळ SHE BOX PORTAL अदयावत करावे. अधिक माहिती करीता पुढिल कार्यालय संपर्क साधावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी .स्टॅण्डजवळ, सातारा संपर्क क्रमांक – ९८५०३५४३९२ व ९८५०१८७१२२ या क्रंमाकावर संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket