संख्याशास्त्रज्ञ डॉ पांडुरंग सुखात्मे, ज्ञानकर्मी मदनराव जगताप बुधच्या भूमितील नवरत्ने
लिंब- सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.या जिल्ह्याने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापलीकडे पोचवले आहे. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या जिल्ह्याने असंख्य नवरत्ने देशाला दिले आहेत.यामध्ये जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ.पी.व्ही. सुखात्मे यांचे नाव आजही सर्वत्र आदराने घेतले जाते.ते बुध पांगरखेल ता. खटाव. जि सातारा येथे त्यांची जन्मभूमी याच भूमीतील असेच एक नवरत्न ज्यांनी शारीरिक प्रतिकूलतेवर मात करीत यशाचे शिखर गौरीशंकर साकारणारे मदनराव जगताप यांनी सातारा जिल्ह्यात ज्ञानक्रांती घडवून बुध पांगरखेल ता खटाव. जि. सातारा चे नाव सातासमुद्रापलीकडे पोचवले आहे.या दोन्ही व्यक्तींनी जीवनात प्रचंड संघर्ष करीत यशाचे शिखर गाठले आहे.
जीवनात सहज काही मिळत नाही यासाठी संघर्ष आणि परिश्रमच करावा लागतो हे त्यांच्या कृतीकडे पाहिल्यानंतर दिसून येते.परिस्थिती कशी असली तरी मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य ते शक्य सहज होते. याचा प्रत्यय या दोन महान व्यक्तींच्या कर्तृत्वातून सिद्ध होते. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या या व्यक्तींनी बुध चे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे.परिस्थितीशी झगडताना नेहमीच उत्तुंग ध्येय ठेवून केलेल्या वाटचालीमुळेच त्यांच्या जीवनात यशाची द्वारे खुली झाली आहेत.डॉ. पी. व्ही. सुखात्मे यांनी संख्याशास्त्रात केलेले नाविन्यपूर्ण संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यांना गौरविले आहे. त्याचप्रमाणे गौरीशंकरचे अध्यक्ष मदनराव जगताप यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.दोन्ही व्यक्ती बुध ता. खटाव येथे जन्मले हा एक मोठा योगायोगच आहे.आजच्या युगात संख्याशास्त्राला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. संख्याशास्त्राच्या आधारे अनेक अवघड वाटणारी संख्याशास्त्रातील मांडणी डॉ. पी. व्ही. सुखात्मे यांच्या संशोधनामुळे नव्या पिढीला सोपे झाले आहे .
त्यांनी यासाठी केलेले कठोर परिश्रम आज कामी येताना दिसत आहे. राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारे डॉ. पी. व्ही. सुखात्मे यांनी संख्याशास्त्र बरोबरच कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देऊन देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.त्याचप्रमाणे सातारच्या कर्मवीरांच्या भूमीत ज्ञानाचे रोपटे लावून त्याचा वटवृक्षात रूपांतर करणारे गौरीशंकर चे अध्यक्ष मदनराव जगताप यांनीही सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात नवी क्रांती घडविली आहे.डॉ. पी.व्ही. सुखात्मे यांच्या विषयी असलेला आदर व प्रेमापोटी गौरीशंकर चे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी त्यांच्या लिंब येथील शैक्षणिक संकुलामधील स्कूलला डॉ. पी.व्ही. सुखात्मे यांचे नाव देऊन त्यांच्या उचित कार्याचा गौरव केला आहे. जन्मभूमीशी असलेले ऋणानुबंधाचा धागा अधिक घट्ट केला आहे.डॉ. पी. व्ही. सुखात्मे व मदनराव जगताप या दोन्ही व्यक्तींनी केलेले कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.बुध च्या भूमीत जन्मलेल्या या नवरत्नाने एक इतिहास घडविला आहे..
श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा.
