Home » देश » पुस्तकाचे गाव’ भिलारमध्ये ‘इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन’चे थाटात उद्घाटन नितीनदादा भिलारे यांचा पुढाकार

पुस्तकाचे गाव’ भिलारमध्ये ‘इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन’चे थाटात उद्घाटन नितीनदादा भिलारे यांचा पुढाकार

पुस्तकाचे गाव’ भिलारमध्ये ‘इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन’चे थाटात उद्घाटन!

​पर्यटकांची चिंता मिटली; नितीनदादा भिलारे यांच्या पुढाकारामुळे स्थानिक व बाहेरील वाहनधारकांना मोठा दिलासा

भिलार -जागतिक कीर्तीचे ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार येथे आता पर्यटनाला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. या भागात येणाऱ्या पर्यटकांची आणि स्थानिक नागरिकांची मोठी अडचण ओळखून, भिलारमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन’चे नुकतेच थाटात उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे आता महाबळेश्वर-पाचगणी तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक वाहनधारकांची चार्जिंगची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

​सध्याच्या काळात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक (EV) कार वापरण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन नगरीत येण्यापूर्वी पर्यटकांना या भागात ईव्ही चार्जिंग मशीन कोठे उपलब्ध आहेत, याचा शोध घ्यावा लागत असे. अनेकदा चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याने पर्यटकांना इच्छा नसतानाही इंधनावर चालणाऱ्या (पेट्रोल/डिझेल) गाड्या घेऊन यावे लागत होते. मात्र आता ‘पुस्तकाचे गाव’ भिलारमध्येच हे अद्ययावत चार्जिंग स्टेशन सुरू झाल्याने पर्यटकांना हक्काचे केंद्र मिळाले असून त्यांची मोठी गैरसोय टळली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही एक मोठी पर्वणी मानली जात आहे.

​स्थानिकांना वाई, साताऱ्याला जाण्याची गरज नाही!

या मशीनमुळे केवळ पर्यटकांनाच नव्हे, तर भिलार व परिसरातील स्थानिक ईव्ही कार धारकांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी गाडी चार्ज करण्यासाठी स्थानिकांना वाई किंवा सातारा येथे जावे लागत होते. मात्र, नितीनदादा भिलारे यांनी विशेष पुढाकार घेऊन हे चार्जिंग सेंटर भिलारमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे स्थानिकांचा वेळ आणि हेलपाटे दोन्ही वाचणार आहेत.

​मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

या नूतन ईव्ही चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. याप्रसंगी कर्तव्य सोशल ग्रुपचे राजेंद्र राऊत, नितीनदादा भिलारे, दिनेश शिंदे, खानविलकर, विश्वनाथ भिलारे, राजू भिलारे, अनिता भिलारे, सावित्रा कसतुरे, मनेजर आदर्श यांच्यासह परिसरातील इतर मान्यवर, ग्रामस्थ आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​भिलार आणि आजूबाजूच्या गावांना या चार्जिंग पंपामुळे आधुनिक सुविधा तर मिळालीच आहे, शिवाय पर्यटनालाही यामुळे अधिक गती मिळणार असल्याचे मत याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले. या सुविधेबद्दल सर्व स्तरांतून नितीनदादा भिलारे व सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket