निष्ठावंताला न्याय : दूरदृष्टी नेतृत्व डॉक्टर नितीन सावंत
सातारा : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अगदी शून्यातून ज्यांची सुरुवात झाली आहे असे सर्वसामान्यांचे नेतृत्व डॉक्टर नितीन सावंत यांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधला प्रवास राजकीय आखाड्यात नशीब आजमावणाऱ्या तरुणांना दिशा देण्यासारखा आहे. कामातील सातत्य आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वरती निष्ठा, सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची कसब डॉक्टर नितीन सावंत यांच्यात आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपर्यात जाऊन नव्या पिढीला ताकत देण्याचा प्रयत्न आदरणीय शरदचंद्र पवार साहेब करत आहेत .महाराष्ट्राचा चेहरा ही नवी पिढी बदलू शकते हा इतिहास निर्माण करणार आहे कारण हे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व आहे.
लोणंद शहरातील मा.शरद पवार यांचे एकनिष्ठ समर्थक डॉक्टर नितीन सावंत यांना 25 ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अखेर जाहीर झाल्याने वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आनंद साजरा होत आहे.खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून डॉक्टर सावंत यांना उमेदवारी साठी धडपड करून मुंबई येथे अखेर उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघात अटीतटीच्या चुरशीत काटे की टक्कर पाहावयास मिळणार आहे डॉक्टर नितीन सावंत यांनी दोन महिने झाले प्रत्येक विभागात गावागावात प्रचार गाठीभेटी देऊन मतदार राजाला आपलेसे करण्यास यश मिळवले त्यामुळे शरद पवार यांनी एकनिष्ठ डॉक्टर नितीन सावंत यांचा विचार करून अखेर उमेदवारी दिल्याने खंडाळा तालुक्याला न्याय मिळाल्याचीं चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
