नाईपर जे.ई.ई परिक्षेत गौरीशंकर देगाव फार्मसीचे यश
देगाव :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल ऐज्युकेशन अँन्ङ रिसर्च गुवाहाटी याच्या मार्फत घेण्यात आलेल्या नाईपर जे.ई.ई परिक्षेत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज आँफ फार्मसी देगाव च्या विद्यार्थ्यानी उज्जवल यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यामध्ये अदिती सावंत, उदयराज मंगरुळे, गणेश लोखंडे, काजल बनकर, प्रणव गोडसे, श्रीकांत टेंबरे, निनाद देशमुख, संकेत कुंभार, कृष्णा देवकर, प्रदिप माने, ओंकार परांडे, स्वप्नाली गुजर या १२ विद्यार्थ्याचा समावेश आहे.
नाईपर जे.ई.ई परिक्षेत नेत्रदिपक कामगिरी करणार्या विद्यार्थ्याचा संस्थेचे संचालक ‘ डॉ अनिरूध्द जगताप याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नागेश अलूरकर, प्रा संध्या बुदेल,प्रा.स्पर्शी बांदेकर, प्रबंधक हेंमत काळे अदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ अनिरुध्द जगताप म्हणाले कि औषधनिर्माण शास्त्र काळानुसार प्रगल्भ व प्रगत होत आहे काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यानी औषधानिर्माण क्षेञातील नविन्यपूर्ण तेचा ध्यास घेवून वाटचाल करावी.
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर ,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले.
