Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साताऱ्यातील निराधारांसाठी मदतीचा हात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांचा नवीन उपक्रम

साताऱ्यातील निराधारांसाठी मदतीचा हात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांचा नवीन उपक्रम 

साताऱ्यातील निराधारांसाठी मदतीचा हात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांचा नवीन उपक्रम 

प्रतिनिधी :सातारा शहरातील फळभाजी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते व संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी निराधारांच्या पुनर्वसनाचा संकल्प केला असून या कामासाठी समाजातून मोठा निधी उभा राहावा यासाठी ते प्रयत्नरत आहेत .या योजनेची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली दिवसाचा एक रुपया म्हणून सेवाभावी वृत्तीने या प्रकल्पासाठी मदत करा असे भावनिक आवाहन त्यांनी केले 

रामाचा गोट सातारा येथील संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था ही वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे .संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी सातारा जिल्हा रुग्णालयात अन्नदान योजना, गरजू नवीन मुलांना कपडे वाटप, रुग्णालयातील रुग्णांना मोफत फळे वाटप ,खाजगी रुग्णालयातील दरपत्रक यांचा यशस्वी लढा, निराधार मुलांना दत्तक घेणे, त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणे, अनाथ मुलींचा विवाह सोहळा ,गरजू मुलांना साहित्य कपडे खाऊ वाटप, बेवारस वयोवृत्त निराधार लोकांना आधार देणे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून साताऱ्याच्या सामाजिक क्षेत्रात आपली ओळख मिळवली आहे आता साताऱ्यातील निराधार निराश्रीत मुलांना पुनर्वसनाच्या दिशेने येण्याकरिता संजीवन संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे . 

मात्र ही मदत लोकसहभागातून होणार असून समस्त सातारकरांनी या उपक्रमासाठी सढळ हाताने मदत करावी .तुमच्या कष्टाचा एक रुपया आणि आमचे प्रामाणिक प्रयत्न अशा माध्यमातून समाजासाठी बांधिलकीच्या नात्याने निराश्रद्धांची पुनर्वसन प्रक्रिया वेगाने राबवता येईल असा विश्वास रवींद्र कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला .या नवीन उपक्रमासाठी लोकप्रतिनिधींना भेटून आपल्या कल्पना सविस्तर सांगणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी उपस्थित पत्रकारांनी या उपक्रमासाठी स्वयंस्फूर्त आर्थिक मदत केली .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket