Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शासन नियमांचा बागुलबुवा उभा करुन, प्रशासनाने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालण्याचा प्रकार करु नये- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

शासन नियमांचा बागुलबुवा उभा करुन, प्रशासनाने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालण्याचा प्रकार करु नये- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

शासन नियमांचा बागुलबुवा उभा करुन, प्रशासनाने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालण्याचा प्रकार करु नये- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी -शासन नियमांचा बागुलबुवा उभा करुन, प्रशासनाने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालण्याचा प्रकार करु नये अशी रास्त अपेक्षा आहे. डॉल्बीच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करावी तथापि एखादी बाब करुच नये यासाठी एका मर्यादेपलीकडे अट्टाहास करु नये, गणेश मंडळांना गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होणार नाही अशी दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी आवाहनात्मक सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासन आणि सर्व संबंधीतांना केली.

सध्या सर्वत्र श्री गणेशाची स्थापना घरगुती स्वरुपांत आणि सार्वजनिक स्वरुपात संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात करण्यात आली आहे. या गणेशोत्सवात कार्यकर्ते युवकांचा उत्साह उदंड आहे. अनेख सार्वजनिक मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक देखाव्यांवर भर दिला आहे. येत्या तीन चार दिवसांनंतर या गणेशोत्सवाच्या उत्साहाला उधाण येणार आहे. याकामी प्रशासनाने सार्वजनिक सुरक्षितेसाठी तसेच ध्वनीप्रदुषण इत्यादीबाबत नियमांची अंमलबजावणी निश्चितच सक्षमपणे केली पाहीजे. सुदैवाने सातारचे पोलिस प्रशासन सहकार्यात्मक योगदान देत कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्रात अग्रगण्य आहे असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले.

तथापि शासन नियमांचा बाऊ करुन, कोणीही कोणत्याही प्रकारे श्री गणेश मंडळांची आणि गणेश भक्तांची मुस्कटदाबी करु नये जिथै चुकेल तेथे समजावून, सहकार्याची भुमिका प्रशासनाची असली पाहीजे अशी रास्त भूमिका खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket