नायगाव तालुका कोरेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन- सरपंच नितीन धुमाळ
केळघर :नायगाव (ता:कोरेगाव) येथे श्री.ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती नायगाव चे सरपंच नितीन धुमाळ यांनी दिली.या पारायण सोहळ्याची सुरुवात काल शनिवार (ता:९) पासून झाली असून समारोप शनिवारी (ता:१६)ला होणार आहे. पारायण सोहळ्याचे हे ३६वे वर्ष असून नायगावचे सर्व ग्रामस्थ,युवक हा पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान देत असल्याचे सरपंच धुमाळ यांनी सांगितले. या पारायण सोहळ्यात कृष्णाबाई धुमाळ, चंद्रकांत महाराज,प्रकाश गुरव ,प्रतापसिंह पवार,मोहन काका, हिंदुराव सोळस्कर,मोहन गुरव यांची प्रवचने होणार आहेत.तर अर्चना शेडगे,अक्षयदास महाराज फडतरे,जयवंत महाराज भोईटे,योगेश महाराज यादव,तन्मय महाराज कदम,सुरेश महाराज गायकवाड,अनिकेत महाराज जगदेव यांची कीर्तने होणार आहेत.काल्याचे कीर्तन परदेशी महाराज यांचे होणार आहे.
दीपोत्सव शुक्रवारी (ता:१५)ला होणार आहे.तरी वरील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक-भक्तांनी घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत नायगाव, भजनी मंडळ, गणेशोत्सव मंडळ,नवरात्रोउत्सव मंडळ नायगाव यांनी केले आहे.





