बोरजाईवाडी गावामध्ये नवरात्रीनिमित्त व्याख्यानमालेचा कार्यक्रम
बाल व्याख्याती मृणाल लवळे आणि बाल शब्दसम्राज्ञी सलोनी सुनील सरतापे यांचे प्रबोधन
“शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास”- म्रूणाल लवळे आणि
“नव्या भारताची नवी आव्हाने” – बालशब्दसम्राज्ञी सलोनी सरतापे यांचे प्रभावी व्याख्यान
बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) –नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बालव्याख्याती मृणाल महेंद्र लवळे हिने शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आणि बालशब्दसम्राज्ञी सलोनी सुनील सरतापे वय १६, गाव पळसावडे, ता. माण, जि. सातारा हीने “नव्या भारताची नवी आव्हाने” या विषयावर वास्तववादी आणि परखड व्याख्यान देऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री बोरजाईवाडीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, पालक आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
सलोनीने आपल्या वक्तृत्वात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील झपाट्याने होत असलेले बदल, देशाच्या विकासासाठी तरुणाईची जबाबदारी आणि समोर उभ्या असलेल्या आव्हानांवर ठोस भाष्य केले. तिने सांगितले की, “नव्या भारतात प्रत्येक तरुणाने ज्ञान, कर्तव्यबोध आणि धैर्य यांचा संगम साधून राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.” तिच्या स्पष्ट आणि ओघवत्या शैलीने श्रोत्यांना विचार करायला भाग पाडले आणि युवा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी संदेश दिला.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बालव्याख्याती मृणाल महेंद्र लवळे ,वय १४, हीने भाषणात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज – जाणता राजा या विषयावर प्रभावी व्याख्यान देऊन उपस्थित श्रोत्यांचे मन जिंकले. शनिवार, झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, नागरिक आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मृणालने आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील धाडस, नीतिमत्ता, लढाईतील कौशल्य आणि राज्यकारभारातील दूरदृष्टी यावर ठोस भाष्य केले. तिने सांगितले की, “शिवाजी महाराजांनी आपले उद्दिष्ट ठरवले आणि प्रत्येक आव्हान पार करून स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तरुणांनी त्यांच्या शिकवणुकीतून धैर्य, निष्ठा आणि कार्यक्षमतेची प्रेरणा घ्यावी.” तिच्या स्पष्ट आणि ओघवत्या शैलीने श्रोत्यांना विचार करायला भाग पाडले आणि युवा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी संदेश दिला.
मृणालने नुकतेच “मराठा साम्राज्य” या विषयावर भाषण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. या यशामुळे तिच्या वक्तृत्वाची छबी आणि प्रभाव अधिक दृढ झाला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सर्व काही समाजासाठी ग्रुप बोरजाईवाडी यांनी केले तसेच या कार्यक्रमाला नवरात्रोत्सव मंडळ, बोरजाईवाडी, ग्रामपंचायत बोरजावाडी, ग्रामस्थ बोरजाईवाडी आणि कार्यकर्ते यांनी सहकार्य केले आणि यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. तसेच श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटरचे सुनील पांडुरंग सरतापे हे उपस्थित होते. व्याख्यानानंतर मृणाल महेंद्र लवळे आणि सलोनी सरतापे यांचा सन्मान करून मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले. श्रोत्यांनी तिच्या वक्तृत्वाचे कौतुक केले आणि अशा कार्यक्रमांचे भविष्यकालीन आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.




