नवी मुंबईत तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली.
नवी मुंबईतील शाहबाज येथे शनिवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु, इमारतीजवळ उभ्या असलेल्या दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
माध्यमांशी बोलताना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणाले, ‘ही इमारत पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोसळली. ही तीन मजली इमारत होती. इमारतीत ३९ प्रौढ आणि १३ मुले राहत होती. दोन जणांना वाचवण्यात यश आले असून, दोन जण अडकल्याची शक्यता आहे.बचाव कार्य चालू आहे.