सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » देश » धार्मिक » सहकार भूषण धन्वंतरी ना. सह. पतसंस्था सातारा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गाचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सहकार भूषण धन्वंतरी ना. सह. पतसंस्था सातारा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गाचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सहकार भूषण धन्वंतरी ना. सह. पतसंस्था सातारा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गाचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सातारा -सोमवार दि.९ मार्च रोजी धन्वंतरी भवन येथे सातारा शहरातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, तसेच महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सहकार भूषण धन्वंतरी ना. सह. पतसंस्था सातारा यांच्या वतीने करणेत आला सदर सोहळ्यास सभासद महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका डॉ. हर्षला बाबर यांनी केले. धन्वंतरी पुजनानंतर सदर सन्मान सोहळ्यास हिरवाई फाऊंडेशनच्या प्रा. मा. संध्या चौगुले या प्रमुख वक्त्याचा परिचय पतसंस्थेच्या संचालिका डॉ. सौ. सारिका मस्कर यांनी करून दिला. त्यांचा सत्कार पतसंस्थेच्या संचालिका डॉ. सौ. मस्कर मॅडम आणि डॉ. बाबर मॅडम यांनी केला. यानंतर नवदुर्गाच्या सन्मान सोहळ्यात स्त्रीरोगतज्ञ मा. डॉ. महानंदा शेटे -यांचा सत्कार सौ. मंगल फडतरे यांचे हस्ते करणेत आला.

तनिष्का ग्रुपच्या जिल्हा प्रमुख मा. केतकी पाटील भोसले यांचा सन्मान संस्थेच्या संचालिका डॉ. सारिका मस्कर यांनी केला नारीशक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा – मा. सुनिशा शहा यांचा सन्मान डॉ. हर्षला बाबर यांचे हस्ते झाला. नेत्रदान, अवयवदान, देहदान समन्वयक मा.डॉ. सुजाता राजमाने यांचा सत्कार सौ. निलम चव्हाण यांनी केला. नृत्यविशारद – मा.डॉ. सौ. पुनम लाहोटी यांचा सत्कार मा. सौ. संध्या काळे यांचे हस्ते झाला. योगशास्त्रात मास्टर्स असणाऱ्या मा.डॉ. सौ. विजया कदम यांचा सन्मान – मा.सौ. माधुरी कोडगुले यांनी केला. सावकार होमिओपॅथी महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी मा. सौ. नीता कणसे यांचा सत्कार सौ. संगिता पवार यांनी केला. हिरकणी फाऊंडेशनच्या संस्थापिक अध्यक्षा – मा. जयश्री शेलार यांचा सन्मान सौ. तृप्ती भोईटे यांनी केला.

तर गिर्यारोहक कु. धैर्या कुलकर्णी हिचा सत्कार सौ. अमृता भोसले यांनी केला. यानंतर “जग बदलणा-या सामान्य स्त्रिया ” हे विशेष व्याख्यान मा.प्रा. संध्या चौगुले यांचे झाले. कु. धैर्या, मा. जयश्री शेलार, मा. सुनिशा शहा यांनी त्यांची मनोगते व्यक्त केली त्यांनी धन्वंतरीच्या मा.सर्व संचालक मंडळाचे सन्मान केल्याबद्दल आभार मानले. महिलांसाठी घेण्यात आलेल्या छोट्या खेळात सौ. श्वेता बोडस आणि सौ. योगिता मोने विजेत्या ठरल्या तर उपस्थित महिलांमधून काढलेल्या लकी ड्रॉ मधे पार्वती फडतरे नशिबवान ठरल्या. या सर्व विजेत्यांना धन्वंतरी ना. सह. पतसंस्थेच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार संस्थेच्या साहा. उपमुख्य कार्य. अधिकारी सौ. अलका मुरूमकर यांनी केले.. कार्यक्रम यशस्वी होणेसाठीअधिकारी सौ. रूपाली शिंदे, सौ सुषमा पवार, सौ सारिका जाधव सौ निशा यादव महिला स्टाफने व संस्थेच्या सर्व सेवकांनी मेहनत घेतली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket