कूपर कॉर्पोरेशन मध्ये राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह उत्साहात साजरा
सातारा -कूपर कार्पोरेशन प्रा. लि. च्या सर्व युनिटमध्ये ४ मार्च ते १० मार्च २०२६ हा सप्ताह राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला सप्ताहाची सुरूवात सर्व युनिटमध्ये सुरक्षितता शपथ घेऊन करण्यात आली कंपनीचे एच आर विभागाचे सी. एच. आर. ओ. श्री नितीन देशपांडे, डायरेक्टर श्री रामेश जाधव, सी सी ओ श्री. असलम फरास आणि सर्व अधिकारी, कामगार व कर्मचारी उपस्थित होते. सदर राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहामध्ये व पूर्ण वर्षभर “शुन्य अपघात” हे कूपर कॉर्पोरशनचे ध्येय असेल, याची सर्वांनी एकमताने शपथ घेतली .
कंपनी व्यवस्थापनाच्यावतीने सेफ्टी मॅनेजर श्री अजित साबळे व त्यांच्या संपूर्ण टिमने सदर राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहामध्ये नाविण्यपूर्वक सुरक्षा प्रशिक्षणांचे कार्यक्रम घेतले. तसेच औद्योगिक सुरक्षितता सप्ताह या विषयावर सुरक्षितता पोस्टर, निबंध, घोषवाक्य व प्रश्न मंजुशा ई. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये कामगार व कर्मचारी यांनी उत्फूर्त पणे सहभाग घेतला.
सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण समारोह श्री सचिन खटावकर, श्री अमित धाडुगडे, श्री अधिक निकम, श्री. पार्थ चक्रवर्ती यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमात सर्वप्रथम श्री सचिन खटावकर यांनी औद्यागिक सुरक्षा वाढविण्यासाठी लोकांचा सहभाग शिक्षण आणि सक्षम या संर्दभात मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमामध्ये कामगारांनी सुरक्षितता व सुरक्षितता साधनांचे महत्व पटवून देणारा पोवाडा सादर केला. सदर कार्यकमाचे आभार प्रदर्शन श्री अजित साबळे यांनी केले.




