राष्ट्रीय मंचावर सातारच्या प्रसन्ना कुंभारचा आवाज गाजला
सातारा -सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी , चैन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या ३७ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५–२६ मध्ये, मिमिक्री या कला प्रकारात चि. प्रसन्ना कुंभार याने तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रसन्ना कुंभार याची निवड साउथ वेस्ट झोन युनिफेस्ट, म्हैसूर येथून राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी झाली होती. आपल्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्याने परीक्षकांची मनं जिंकत राष्ट्रीय पातळीवर तिसरे स्थान मिळवले. तो सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. ज्ञानदेव मस्के, कुलसचिव मा. डॉ. विजय कुंभार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. रामराजे माने-देशमुख, तसेच सांस्कृतिक विभागाचे समन्वयक राजेंद्र संकपाळ आणि डॉ. विद्या पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. प्रसन्नाच्या या यशामुळे विद्यापीठ व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला असून, इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.




