तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने
Home » देश » नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बेळगांव मध्ये घेणार पत्रकार परिषद 

 कराड : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. २१ ते २७ एप्रिल दरम्यान ५७ शहरांमध्ये ५७ पत्रकार परिषदा होतील. या मोहिमेला ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ असे नाव देण्यात आले आहे. या काळात भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल, असे पक्षाने म्हटले आहे. 

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून 57 नेत्यांची यादीच प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राजस्थान चे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, मणिकम टागोर, गौरव गोगोई, सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कन्हैया कुमार, रणदीप सिंग सुरजेवाला, राजीव शुक्ला, अलका लांबा अशा अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बेळगांव येथे 23 एप्रिल रोजी सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटी, बेळगाव येथे पत्रकार परिषद होणार आहे. 

१९ एप्रिल रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि आघाडीच्या संघटनांच्या प्रमुखांच्या बैठकीत देशभरात पत्रकार परिषदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई) तडीपार इसमास जेरबंद करुन

Live Cricket