सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » नामदार मकरंदआबा पाटील यांचे बुधवारी जिल्हयात आगमन कार्यकर्त्यांकडुन जंगी स्वागताची तयारी-प्रमोद शिंदे

नामदार मकरंदआबा पाटील यांचे बुधवारी जिल्हयात आगमन कार्यकर्त्यांकडुन जंगी स्वागताची तयारी-प्रमोद शिंदे 

नामदार मकरंदआबा पाटील यांचे बुधवारी जिल्हयात आगमन कार्यकर्त्यांकडुन जंगी स्वागताची तयारी-प्रमोद शिंदे 

सातारा -वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याने मतदार संघात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यानंतर बुधवार दि. 25 रोजी प्रथमच जिल्ह्यात येत असुन कार्यकर्त्यांमार्फत नामदार मकरंदआबा पाटील यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्यातील मतदारांनी मकरंदआबांवर पुन्हा विश्वास टाकत त्यांना 61 हजार मताधिक्याने निवडुण आणलेले होते. सलग 15 वर्षे आमदारकीचा अनुभव असलेले व सर्वसामान्यांच्या हृदयातील आपला वाटणारा माणुस म्हणून आमदार मकरंदआबांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विश्वास टाकत मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिलेले आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणुन निवड झालेनंतर सातारा जिल्ह्यात बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी प्रथमच आगमन होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये स्फुर्तीदायी वातावरण निर्माण झालेले आहे.

शिंदेवाडी येथे सकाळी 9 वाजता आगमन होणार असुन तेथे स्वागत केले जाईल. तदनंतर स. 9.15 वा. शिरवळ, 9.50 वा. नायगांव, 10.30 वा. खंडाळा, 11.00 वा. वेळे, 11.30 वा. सुरूर, 11.45 वा. कवठे, दुपारी 12.05 वा. बोपेगांव, 12.30 वा. जोशीविहिर, 12.45 वा. भुईंज, 1.15 वा. पाचवड, 1.45 वा. उडतरे, 2.00 वा. विरमाडे, 2.15 वा. मर्दै फाटा, 2.30 वा. लिंब फाटा, 2.50 वा. सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथे, 3.50 वा. नागठाणे, सायं. 4.10 वा. काशिळ, 4.30 वा. उंब्रज, 5.00 वा. कराड शहरात आगमन तर सायं. 5.30 वा. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर आगमन व अभिवादन करणार असल्याची माहिती दिलेली आहे.

महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नामदार मकरंदआबा पाटील यांच्या स्वागतासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये तीन दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याची सुरुवात नाशिक, दि. २८

Live Cricket