Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » ना.जयकुमार गोरे संघर्षातून पुढे आलेले नेतृत्त्व : डॉ मनोहर ससाणे

ना.जयकुमार गोरे संघर्षातून पुढे आलेले नेतृत्त्व : डॉ मनोहर ससाणे

ना.जयकुमार गोरे संघर्षातून पुढे आलेले नेतृत्त्व : डॉ मनोहर ससाणे

      ना. जयकुमार गोरे हे प्रचंड संघर्ष करून पुढे आलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल असे गौरवोउद्गार डॉ मनोहर ससाणे यांनी काढले.

        ना.जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून निवड झाली. त्यानंतर प्रथमच त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी पाचवड ता. वाई येथे जीवनप्रकाश हॉस्पिटल समोर वाई तालुका भाजपा तर्फे तसेच पाचवड ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

       याप्रसंगी आ. मनोज घोरपडे, भाजपा नेते मदनदादा भोसले, वाई तालुका भाजपाचे अध्यक्ष श्री दिपक ननावरे, जनता अर्बन बँकेचे संस्थापक श्री सुरेश कोरडे, पाचवडचे सरपंच श्री महेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्री नितिन विसापूरे, आरपीआयचे श्री अशोक गायकवाड, बांधकाम व्यावसायिक श्री किशोर बोराटे उपस्थित होते.

         यावेळी बोलताना डॉ मनोहर ससाणे म्हणाले की जिल्ह्याला प्रथमच ५ कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील (आबा), जयकुमार गोरे आणि शंभूराजे देसाई सर्व मंत्री तरुण, अनुभवी आणि विकासाची तळमळ असणारे आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात सातारा जिल्हा हा एक प्रगत जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जाईल.

        यावेळी सत्काराला उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांचे आभार मानले आणि मी स्वतः तसेच इतर सहकारी मंत्री जिल्ह्याच्या विकासात गांभीर्याने लक्ष घालू आपसात योग्य समन्वय ठेवून विकासाच्या दृष्टीने सातारा जिल्हा आदर्श कसा होईल याकडे लक्ष देऊ असे आश्वासन दिले. त्याचबरोबर मंत्रीपदी निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांचे आभार मानले.

       कार्यक्रमाला पाचवड, वाई, बावधनचे ग्रामस्थ तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket