माझं गाव माझा अभिमान या संकल्पनेतून सुरु असलेले नेहरू युवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद ; आमदार जयकुमार गोरे
भुईंज (महेंद्रआबा जाधवराव) नेहरू युवा मंडळ सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे विधायक उपक्रम राबवित असते, मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद आहेत ,’ असे प्रतिपादन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे न यांनी व्यक्त केले.
गोपूज, ता. खटाव येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वनाधिकारी वैभव घार्गे, चंद्रकांत घार्गे, बाळासाहेब चव्हाण, रोहित खराडे, रणजित चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, सागर घार्गे, रामदास घार्गे, राजू मुल्ला, संजय गुरव, राजेंद्र घार्गे, बाबू मुल्ला, कैलास कमाने, इंद्रजित घार्गे, ऋषिकेश घार्गे, सोपान गायकवाड, अनिल मदने आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नेहरू, मलकेश्वर तसेच इतर तरुण मंडळाचे सभासद उपस्थित होते.
यावेळी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना गोपूजचे सुपुत्र व अजिंक्यतारा साखर कारखान्याचे लेबर ऑफिसर रणजित चव्हाण म्हणाले, नेहरू युवा मंडळाच्यावतीने गणेशोत्सवा निमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक भावनेतून गेल्या चार वर्षा पाठीमागे स्टॅन्ड पासून गावापर्यंत दुतर्फा लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे आज दिमाखात उभी आहेत. या मुळे गावच्या वैभवात भर पडत आहे. त्यांचा आज वाढदिवस गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला,तसेच ज्या ठिकाणची झाडे खराब झाली होती त्या ठिकाणी नवीन झाड लावून ते जोपासण्याचा संकल्प मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केला असून, उपविभागीय वनाधिकारी श्री वैभव घार्गे साहेब यांचे या उपक्रमास नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे रणजित चव्हाण यांनी सांगितले.
रणजित चव्हाण म्हणाले, नेहरू युवा मंडळाच्यावतीने गणेशोत्सवा निमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक भावनेतून गेल्या चार वर्षा पाठीमागे स्टॅन्ड पासून गावापर्यंत दुतर्फा लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे आज दिमाखात उभी आहेत. या मुळे गावच्या वैभवात भर पडत आहे. त्यांचा आज वाढदिवस गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला,तसेच ज्या ठिकाणची झाडे खराब झाली होती त्या ठिकाणी नवीन झाड लावून ते जोपासण्याचा संकल्प मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केला असून, उपविभागीय वनाधिकारी श्री वैभव घार्गे साहेब यांचे या उपक्रमास नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे रणजित चव्हाण यांनी सांगितले.
