Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मायबाप जनता स्वयंस्फूर्तीने दुष्काळमुक्तीच्या लढ्याला साथ द्यायला मैदानात उतरत आहे -आ.जयकुमार गोरे

मायबाप जनता स्वयंस्फूर्तीने दुष्काळमुक्तीच्या लढ्याला साथ द्यायला मैदानात उतरत आहे -आ.जयकुमार गोरे 

मायबाप जनता स्वयंस्फूर्तीने दुष्काळमुक्तीच्या लढ्याला साथ द्यायला मैदानात उतरत आहे -आ.जयकुमार गोरे 

सातारा 🙁 प्रतिनिधी ) मला माझ्या कर्तुत्वामुळे भाजपने सन्मानाने पहिल्या यादीत विधानसभा निवडणूकीचे तिकीट जाहीर केले. विरोधी महाविकास आघाडीत मात्र घोळात घोळ सुरु होता. उमेदवार इथला, मतदार इथले मात्र तिकीट ठरवण्यासाठी विरोधी टोळके बारामती, फलटणच्या सतरंज्या उचलत होते. मला रोखण्यासाठी बारामती, फलटण, कराड, अकलूजसह अनेक रथीमहारथी माण खटावमध्ये येत आहेत, मात्र मारुन मुटकून उमेदवार केलेले प्रभाकर घार्गे निवडणूक का लढत आहेत ते सांगू शकत नाहीत. प्रत्येक सभेत ते आणि ठरलयवाले टोळके बोरीचा बार भरवत असल्याचा टोला आ. जयकुमार गोरेंनी विरोधी महाविकास आघाडीला लगावला. 

     गोंदवले गटाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    आ. गोरे पुढे म्हणाले, ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याने प्रत्येक सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी जमत आहे. मायबाप जनता स्वयंस्फूर्तीने दुष्काळमुक्तीच्या लढ्याला साथ द्यायला मैदानात उतरत आहे. समोरची गर्दी पाहून माझ्या सारखा मीच भाग्यवान असल्याचे दिसून येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून माण – खटावच्या निवडणूकांमधील पक्ष आणि उमेदवार बदलले मात्र पाणीप्रश्न सोडवण्याचा जाहीरनामा बदलला नव्हता. १५ वर्षांपूर्वी मी दुष्काळमुक्तीचे स्वप्न दाखवून जनतेला साद घातली. जनतेने माझ्यावर मोठा विश्वास ठेवला. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी खूप मोठा त्याग करत संघर्ष केला. उरमोडी, जिहेकठापूर, तारळीचे पाणी आणले. ऊसाची बागायती शेती सुरु झाली. कारखाने सुरु झाले. टेंभू योजनेची कामे सुरु झाल्याने दोन्ही तालुक्यातील ५२ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागतोय. उत्तर माणमधील ३२ गावांना पाणी पोहचायला सुरुवात झाली आहे. आज गोंदवले गटातील प्रत्येक गावात पाणी पोहले तरी अंगात पाणी नसलेले विरोधक पाणी कुठे आहे असा प्रश्न विचारुन मूर्खपणा करत आहेत. मी २४ बाय ७ दुष्काळमुक्तीसाठी काम करत आलोय. आम्हाला दुष्काळी म्हणून हिणवले जायचे. तो दुष्काळी कलंकच येत्या तीन वर्षात पुसून टाकतोय. पाणी आणण्याबरोबर हावागावात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. रस्त्यांचे जाळे विणले आहे. माझ्या मातीच्या स्वाभिमानाच्या तसेच दुष्काळमुक्तीच्या लढाईत आडवे येणाऱ्यांना आडवे करत माझी वाटचाल सुरुच रहाणार आहे. मी जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे पाणी घेऊन गेलो तिथे तिथे इथल्या निष्क्रिय औलादी आडव्या पडल्या आहेत. विरोधकांनी कधी मी आणलेल्या पाण्याचे स्वागत करयाची दानत दाखवली नाही. त्यांची प्रत्येक विकासकामात आणि दुष्काळमुक्तीच्या लढ्यात खोडा घालायची प्रवृत्ती जनताच संपवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

मतदारसंघात कॅनॉलचे वहाणारे पाणी, बागायती शेती आणि कारखान्यांची पेटलेली घुराडी पहायचीत असा तीन ओळींचा अजेंडा घेऊन मी २००९ साली माण – खटावच्या राजकारणात आलो. १५ वर्षे जीवापाड मेहनत करुन माझा तो अजेंडा पूर्णत्वाला नेताना जनतेला दाखवलेले स्वप्न साकार करत आणले आहे. हजारो कोटींचा निधी मिळवून पाणीयोजना मार्गी लागल्या आहेत. दुष्काळात पाण्याचे टॅंकर मागणारी येथील जनता आता हक्काने ऊस तोडयला टोळी मागू लागली आहे. मी आमदार होण्याचे फलित आता दिसायला लागले आहे .

– आ. जयकुमार गोरे 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 20 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket