अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; खचलेला रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त नगरपरिषदेची वेगवान कामगिरी; चार दिवसांत रस्ता सुरू

नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; खचलेला रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त नगरपरिषदेची वेगवान कामगिरी; चार दिवसांत रस्ता सुरू

नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; खचलेला रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त नगरपरिषदेची वेगवान कामगिरी; चार दिवसांत रस्ता सुरू

महाबळेश्वर प्रतिनिधी -महाबळेश्वर आणि तापोळा या मुख्य पर्यटन व ग्रामीण भागाला जोडणाऱ्या महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील फळणे वस्तीजवळील रस्त्याचा मोठा भाग खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, प्रशासनाची सतर्कता आणि नगरपरिषद  लोकप्रतिनिधी यांच्या अहोरात्र प्रयत्नांमुळे हा खचलेला रस्ता अवघ्या ४ दिवसांत युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात आला असून, वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे फळणे वस्तीजवळील परिसरातील रस्त्याखालील माती व भराव वाहून गेला होता. यामुळे रस्त्याचा मोठा भाग खोलवर खचला होता.

या मार्गावरून दररोज शेकडो पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, एसटी बस आणि दुधाच्या वाहनांची मोठी रहदारी असते. रस्ता खचल्यामुळे तापोळा खोऱ्यातील 105 गावांचा महाबळेश्वर शहराशी असणारा संपर्क तुटण्याचा आणि मोठा अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून नगरपरिषदेच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. सलग ४ दिवस दिवस-रात्र हे काम सुरू होते.रस्ता दुरुस्ती साठी ५० ब्रास २० ब्रास खडी व 20 ब्रास मुरूम तसेच पोकलेन जेसेबी इतके साहित्य वापरणेत आले.तसेच नगरअभियंता श्री. धायगुडे दररोज १५ ते २० कामगारांचे पथक, जेसीबी आणि टिपरच्या साहाय्याने सतत कार्यरत होते.

रस्त्याचा खचलेला भाग आधी दगड आणि मुरुमाचा भराव घालून पाया भक्कम करण्यात आला, त्यावर खडी दाबून रस्ता पूर्णपणे सुरक्षित आणि वाहतुकीयोग्य करण्यात आला आहे.

“रस्ता खचल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेने पोकलेन व जेसीबी च्या सह्याने तात्काळ काम सुरू केले. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी ५० ब्रास दगड, 20 ब्रास खडी आणि 20 ब्रास मुरुमाचा वापर करत 15-20 कर्मचारी व नगराभियंता यांनी गेले 4 दिवस मेहनत घेत रस्ता पूर्ववत केला. नागरिक, शालेय विद्यार्थी व पर्यटक यांच्या सुरक्षेतेला व सेवेला आमचे पहिले प्राधान्य आहे.”

-मुख्याधिकारी योगेश पाटील 

तापोळा मार्गावर रस्ता खचल्यामुळे प्रवासाचा आणि भाजीपाला व दुधाच्या वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाने अवघ्या चार दिवसांत रस्ता दुरुस्त केल्याने एसटी बस व इतर वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल आम्ही नगरपालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे आभारी आहोत..

स्थानिक नागरिक 

सदर रस्ता दुरुस्तीचे काम अत्यंत कमी कालावधीत पूर्ण व्हावे यासाठी माननीय मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी नगराध्यक्ष सुनील शिंदे व मुख्याधिकारी योगेश पाटील यांना तात्काळ मार्ग सुरु करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. 

कामाच्या ठिकाणी जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, नगरसेवक अफझल सुतार, संतोष शिंदे, संजय जंगम, रोहित ढेबे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पंचायत समिती उपसभापती संजय मोरे, यांनी कामाच्या ठिकाणी भेट देत समाधान व्यक्त केले.

नगरपरिषदेचे नगर अभियंता मुरलीधर धायगुडे, बांधकाम मुकादम संदीप पवार,सुनील केळगणे मारुती साळुंखे आणि नगरपरिषद बांधकाम विभागाकडील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सदर काम यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या या तत्परतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

रस्ता पूर्ववत सुरू झाला असला तरी पावसाळ्याच्या दिवसांत या डोंगराळ भागात वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा, तसेच वळणावर काळजीपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket