मुंबई: वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सी प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई -मुंबईतील वांद्रे ते कुर्ला दरम्यान पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्याबाबत आज विशेष बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.या बैठकीत पॉड टॅक्सीबाबत विशेष सादरीकरण करण्यात आले, ज्यात कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बीकेसी भागात या सेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या भागातील वाढती वर्दळ लक्षात घेता, नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळवून देण्यासाठी पॉड टॅक्सी एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. हा प्रकल्प देशातील एकमेव मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा, असेही बैठकीत सांगितले गेले.
या बैठकीत उपस्थित होते:
असीम गुप्ता, अपर मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय नविन सोना, प्रधान सचिव संजय मुखर्जी, आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,अश्विन मुदगल, अतिरीक्त आयुक्त,अनिल कुंभारे, पोलिस महानिरीक्षक
हा प्रकल्प राबविल्यानंतर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणे आणि प्रवाशांना सुलभ वाहतूक सुविधा मिळणे अपेक्षित आहे.
