वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » ठळक बातम्या » सातारा शहर परिसरातील खराब रस्ते न सुधारल्यास आंदोलन -राहुल पवार

सातारा शहर परिसरातील खराब रस्ते न सुधारल्यास आंदोलन -राहुल पवार 

सातारा शहर परिसरातील खराब रस्ते न सुधारल्यास आंदोलन -राहुल पवार 

सातारा :सातारा शहरातील रस्त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र चार सहा महिन्यात याच रस्त्यावर मोठमोठे खड्डे दिसून येत आहेत. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवर लोकप्रतिनिधी शांत का?ऐतिहासिक साताऱ्यात खड्डेच खड्डे चौहीकडे, अशा दशा झाली असून नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. याविरोधात जनआंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राहुल पवार  सांगितले.

सातारा शहरातील शाहूनगर, गोडोली,सायन्स कॉलेज, पेंढारकर हॉस्पिटल,शाहूपुरी, तामजाईनगर , मल्हारपेठ, जगताप कॉलनी, चार भिंती , बुधवार नाका, आयटीआय या परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित मुजवावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन तसेच रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देऊन इशारा दिला आहे. खड्ड्यामध्ये सांडपाणी साचून वाहन चालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. दुर्दैवी अपघात होण्याची शक्यता असून सध्या शाळा कॉलेज चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढवून डेंगू, मलेरियाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका आहे. तरी या संबंधित विषयावर आपण समक्ष लक्ष घालून संबंधीत ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित मुजविण्यात यावे. सातारा शहरातील प्रत्येक भागात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी. शहरातील खड्ड्यामुळे दुर्दैवी अपघात होऊन घटना घडल्यास या सर्वस्वी संबंधित नगरपालिकेचे प्रशासन जबाबदार असेल, याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांनी अतिरिक्त मुख्याधिकारी दामले ,बांधकाम अधिकारी छिद्रे, स्वच्छता विभागाचे गणेश टोपे यांना निवेदन दिले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहर पदाधिकारी आक्रमक आंदोलन आणि प्रमुख रस्ता रोको करणार असा इशारा निवेदन देताना दिला.यावेळी शहर उपाध्यक्ष भरत रावळ, अझहर शेख ,विभाग अध्यक्ष गणेश पवार, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket