मोरणा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून. मोरणा धरणाची पाणी पातळी 656.50 मी. इतकी झाली आहे. धरणात 69.42% इतका पाणीसाठा झाला आहे.
सातारा -जलाशय परिचालन सूचिनुसार पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेले नाहीत. सांडव्यावरून 3080 cusecs इतका विसर्ग चालु आहे.तसेच सिंचन / विद्युत विमोचकामधून 173 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. एकुण 3253 क्युसेक्स विसर्ग नदी पात्रात चालु आहे.
गेल्या 24 तासांमध्ये मोरणा धरण क्षेत्रामध्ये 294 मीमी पावसाची नोंद झाली असलेने धरणांमधील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. तसेच याप्रमाणामध्ये पावसाचे प्रमाण राहिलेस सांडव्यावरुन विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
मोरणा नदीच्या पात्राजवळील सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.कोणीही नदी पात्रात उतरू नये.





