सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » ठळक बातम्या » आरोग्य » हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक ९ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक ९ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक ९ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे अथवा चिंता, नैराश्य यामुळे सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. सध्या हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. जर आपल्याला वारंवार छातीमध्ये दुखणे, घाम येणे, चक्कर येणे, धाप लागणे, गुदमरणे, साखरेचे प्रमाण वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे अशा प्रकारच्या गोष्टींची तक्रार आहे त्यांनी आपली तपासणी करुन घेणे जरुरीची आहे. यासाठी अँजिओग्राफी  करुन घेणे आवश्यक ठरते. अँजिओग्राफी मध्ये  रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये काही दोष, अडथळा आहे का हे कळून येते.

 अँजिओग्राफी   किंवा आर्टिरिओग्राफी एक वैद्यकीय इमेजिंग तंत्र आहे. ज्याचा उपयोग रक्तवाहिन्या आणि शरीराच्या अवयवांच्या आतील किंवा लुमेनची कल्पना करण्यासाठी केला जातो. याकरिता हृदयविकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयोगी पडते. सातारा, रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेस येथे गुरूवार, दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ आणि मिशन हॉस्पिटल, वाई येथे १२ ते २ यावेळेत रुबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत. तरी रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऑपरेशन्स मॅनेजर श्री. स्वप्नील जंगम यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket