वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » ठळक बातम्या » आरोग्य » सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर

सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर

सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर

सातारा, दि. : गुडघा व खुबेदुखीकडे बऱ्याच वेळेला नागरिक दुर्लक्ष करतात. भविष्यात या समस्या आणि वेदना आणखीनच वाढू शकतात. तुम्हाला किंवा आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना गुडघे किंवा खूबे दुखीचा त्रास होत असेल तर वेळ न दवडता 25 जून रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे होणाऱ्या मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिरात आजच नाव नोंदणी करून घ्या.

सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर, एम.डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट व हेलिओस ऑरथोजॉइंटचे ऑरथोपेडिक सर्जन डॉ. सौरभ गिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २५ जून रोजी मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबीर होणार आहे. देवी कॉलनी, सदरबझार येथे सातारा डायम्नोस्टिक सेंटर मध्ये दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर होईल.

रोबोटिक सर्जरी मध्ये निष्णात असलेले डॉ. सौरभ गिरी हे सध्या पुण्याच्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट अँड रिप्लेसमेंट विभागाचे प्रमुख आणि एकॉर्ड हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 14 वर्षांचा प्रचंड अनुभव आहे. डॉ. सौरभ गिरी स्वतः रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

खुबे आणि गुडघे तपासणी व सल्ला शिबिरात ५० टक्के या सवलतीच्या दरात एक्स-रे स्क्रिनिंग केले जाणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर काही तासात चालता येते. जलद रिकव्हरी होत असल्याने या तपासणी शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार येथे नाव नोंदणीसाठी मोबाईल ९१६८४३२४३२ वर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटरचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश शिंदे यांनी केले आहे.

रोबोटिक प्रत्यारोपण शस्त्रक्रियाच का?

“ही शस्त्रक्रिया पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा खूपच आधुनिक आहे. त्यामध्ये शस्त्रक्रियेनंतर किमान वेदना कमीतकमी असतात. रक्तस्रावही कमीतकमी असतो. यामध्ये हाडांचे नुकसान टाळता येते. अचूक असल्यामुळे सांध्यांचे आयुष्य वाढते. सांध्यांचे संरेखन उत्तम असते. जलद रिकव्हरी होत असल्याने शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्ण चालू शकतो”

डॉ. सौरभ गिरी

रोबोटिक सर्जरी तज्ज्ञ 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket