तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मियांसोबत साजरी केली दिवाळी

आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मियांसोबत साजरी केली दिवाळी 

आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मियांसोबत साजरी केली दिवाळी 

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )मेढा येथे फराळाचाही घेतला आनंद; कमळाला मतदान करण्याचा जनतेचा निर्धार सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, मेढा येथील कुंभारवाड्यात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मातील विविध समाजातील लोकांसोबत अनोखी दिवाळी साजरी करून फराळाचा आनंद घेतला. यामुळे कातकरी वस्ती, गोसावी वस्ती, कुंभारवाडा, चर्मकार समाज, मुस्लिम समाज, जयभीम विकास मंडळ आंबेडकरनगर, ओतारी समाज, वीरशैव समाज आदी समाजातील उपस्थित लोक भारावून गेले. 

           शिवेंद्रसिंहराजेंचा सातारा- जावली मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु असून त्यांनी गाव, वाडी- वस्ती येथे जाऊन घर टू घर भेट देऊन मतदारांशी संवाद साधण्याला प्राधान्य दिले आहे. मेढा ता. जावली येथील कुंभारवाडा येथे कातकरी वस्ती, गोसावी वस्ती, कुंभारवाडा, चर्मकार समाज, मुस्लिम समाज, जयभीम विकास मंडळ आंबेडकरनगर, ओतारी समाज, वीरशैव समाज, वाणी समाज, घिसाडी समाज आदी सर्वच समाजातील माता- भगिनी आणि नागरिक यांच्यासमवेत शिवेंद्रसिंहराजेंनी दिवाळी साजरी केली. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी नगरसेवक शशिकांत गुरव, शिवाजी गोरे, संतोष वारागडे, जब्बार पठाण यासह सर्व समाजातील प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

          आपण मेढा नगरीतील गल्ली बोळातील रस्त्याचे कामही मार्गी लावले आहे. मेढा नगरीचा झपाट्याने विकास करण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक गाव, वाडी- वस्ती येथे काँक्रीटचे रस्ते केले आहेत. प्रत्येक समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गेल्या पाच वर्षात जावली असो अथवा सातारा तालुका असो, दोन्ही तालुक्यात हजारो कोटींची विकासकामे मार्गी लावली आहेत. मतदारसंघाचा विकास साधण्याबरोबरच आपण प्रत्येक समाजाला न्याय दिला आहे, सर्वधर्म समभाव जपून सर्व समाजाला एकोप्यात ठेवण्याचे काम केले आहे. पाच वर्षात दमडीचेही काम न करणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत मतदारसंघातील जनता जागा दाखवेल. जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जनता कायम माझ्या सोबत आहे आणि मीही जनतेसोबत कायम आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. तरीही कोणीही गाफील न राहता विक्रमी मताधिक्य देऊन एक वेगळा इतिहास घडवावा, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई) तडीपार इसमास जेरबंद करुन

Live Cricket