आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये ॲन्टी रॅगिंग व लैगिंक छळ प्रतिबंध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
केळघर:मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालया मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत जनजागृती व विद्यार्थी सुरक्षितता या अनुषंगाने ॲॅन्टी रॅगिंग व लैंगिक छळ प्रतिबंध संदर्भातील कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी रॅगिंग म्हणजे काय, रॅगिंग गैरप्रकार कसे केले जातात,अशा प्रकाराला कोणीही बळी पडू नये कायद्यामधे यासाठी कोणकोणत्या शिक्षेची तरतूद आहे या विषयी मार्गदर्शन करून पोलीस सदैव आपल्या सोबत आहेत असा विश्वास मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिला.
आजच्या सोशल मीडियाच्या जगातील वाढती नवनवीन आव्हाने व वाढती गुन्हेगारीला विद्यार्थी कसे बळी पडतात या विषयी ही श्री.सुधीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून सुसंवाद साधला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लैंगिक छळ प्रतिबंधक समितीचे समन्वयक प्रा.श्री प्रवीण जाधव यांनी केले .यावेळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा व विद्यार्थी सुरक्षितता याविषयी माहिती दिली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ अशोक व्हि गिरी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सर्व विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची सुरक्षितता व काळजी कशी घ्यावी याबाबतीत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी सुरक्षितता या दृष्टीने महाविद्यालयात असलेल्या विविध सुविधा तक्रारपेटी, सीसीटीव्ही कॅमेरे व कार्यरत असणारी अँटी रॅगिंग,लैंगिक छळ प्रतिबंधक समिती, विद्यार्थी सुरक्षितता समिती तसेच या शिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी प्राचार्य म्हणून मी व माझे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेळी महाविद्यालयात उपलब्ध असतो.जयवंत प्रतिष्ठान चे सन्माननीय अध्यक्ष मा आमदार शशिकांत शिंदे साहेब व संस्थेच्या सन्माननीय सचिव मा वैशाली शिंदे मॅडम यांचे आपणास मोलाचे सहकार्य नेहमीच लाभत असते याचा
आवर्जून उल्लेख केला.आपल्या महाविद्यालया मध्ये आपण सर्वजण अतिशय सुरक्षित आहात असा मी आपणास विश्वास देतो. याप्रसंगी अँटी रँगिंग संदर्भातील भित्तीपत्रक व पोस्टरच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ प्रमोद घाटगे सर यांनी शुभेच्छा दिल्या.लैंगिक छळ प्रतिबंधक समितीचे प्रा प्रविण जाधव, प्रा सौ . धनश्री देशमुख मॅडम व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्य समन्वयक प्रा संतोष कदम व सहाय्यक समन्वयक प्रा सौ सुषमा काळे मॅडम सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा.सौ गायत्री जाधव मॅडम यांनी केले तर आभार प्रा.धनश्री देशमुख मॅडम यांनी मानले.
