महाबळेश्वर तालुक्यातील झाडांनी प्रकरणात आमदार मकरंद पाटील लाभदायक युवा नेतृत्व विराज शिंदेचा आरोप
सातारा जिल्ह्यातील सध्या देशभर गाजत असलेले गुजरात कनेक्शन समोर आलेले ‘झाडाणी प्रकरणातील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्या रिसॉर्टला वीज पुरवठा करण्यासाठी वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या पदाचा व शासकीय निधीचा गैरवापर केला आहे.’ असा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदेंनी सातारा येथे पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. ‘जिल्हा नियोजन समितीतून 22 केव्ही एचटी लाईन टाकून वीज पुरवठा देण्यासाठी तब्बल 51 लाख 86 हजार 540 रुपयांचा निधी वापरला आहे. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांची आमदारकी रद्द करावी, त्यांच्यावर कारवाई करावी.’, अशी मागणीही केली आहे.
कागदोपत्री पुराव्यासह पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी हे गाव पुनर्वसित झाले असून या ठिकाणी कोणतीही मानवी वस्ती नाही. येथील ग्रामस्थांचे रायगडला पुनर्वसन झाले आहे.
मात्र, या गावात नंदूरबार, अहमदाबाद, गुजरात, मुंबई येथील काही बड्या अधिकाऱ्यांनी व राजकीय वलय असलेल्यांनी एकत्रितपणे मोठ्याप्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. त्या ठिकाणी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी सालोशी येथील वळवी वस्ती येथे आदित्य चंद्रकांत वळवी यांच्या नावे बांधकाम केले आहे.