गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा जिल्हा बँकेत पराभव करणारे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघात इतिहास घडवणार
सातारा (अली मुजावर )सत्यजितसिंह पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघात इतिहास घडवणार नुकत्याच पाटणच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार हा सत्यजितसिंह पाटणकर यांच्या कार्य कुशल नेतृत्वावर कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये निश्चित बदल होणार असल्याची माहिती राजकीय जाणकारांच्या कडून मिळत आहे..
पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर नाराज असलेल्या शरदचंद्र पवार गटाचे नेते सत्यजित पाटणकर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पाटण विधानसभेचे राजकारण देसाई आणि पाटणकर या दोन घराण्यांभोवती फिरत आले आहे.
सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर हे आक्रमकपणा दाखवत नाहीत, त्यांच्या राजकारणाची पद्धत संयमी आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू व विद्यमान गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा जिल्हा बँकेत पराभव करणारे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा विधानसभेला आत्मविश्वास वाढल्याने पाटण तालुका विधानसभा मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाची लाट दिसून येत आहे.कोणत्याही विजयाने हुरळून व पराभवाने खचून न जाता सत्यजितसिंहांनी सातत्याने आपली वाटचाल कायम ठेवली.सत्यजितसिंह पिताश्री विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन व निष्ठावंतांच्या सहकार्यातून पाटण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत सामोरे जाणार आहेत.सत्यजितसिंहांची ही दमदार एंट्री विजयाची नांदी मानली जात आहे.
