मंत्री ना.श्री.जयकुमार गोरे यांनी माण खटाव विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या गावांच्या नुकसानीची पाहणी केली.
सातारा जिल्ह्यासह माण खटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान होऊन शेतकरी व नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला.
याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.श्री.जयकुमार गोरे यांनी रविवार, दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी माण_ खटाव विधानसभा मतदारसंघातील कातरखटाव, रानमळा ,ढोकळवाडी, कलेढोण, पडळ , कुकुडवाड , पुकळेवाडी, वडजल ,गट्टेवाडी सह अनेक गावात भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
शेतीचे, पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच नागरिक व शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतकरी बांधवांना पिक नुकसान, घरांची पडझड भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. लवकरात लवकर आणि जास्तीची मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला. तसेच तुटलेले पुल व रस्ते लवकरात लवकर पुर्ववत दुरुस्त करुन देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना देखील तत्काळ सूचना दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रांत सो. उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने , खटाव तालुका भा.ज.पा. मा. अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब, भा.ज.पा. सातारा जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांच्यासह आदी मान्यवर शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
