Home » राज्य » प्रशासकीय » वाई–पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याला गती देण्यासाठी मंत्री मकरंदआबा पाटील मैदानात

वाई–पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याला गती देण्यासाठी मंत्री मकरंदआबा पाटील मैदानात

वाई–पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याला गती देण्यासाठी मंत्री मकरंदआबा पाटील मैदानात

वाई (अली मुजावर ) पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सुरूर–वाई–पाचगणी–महाबळेश्वर–पोलादपूर या मार्गावरील रस्त्याची झालेली दुरवस्था आणि संथगतीने सुरू असलेले काम यामुळे नागरिक व पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने ॲक्शन घेतली आहे.

वाई–महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील या महत्त्वाच्या रस्त्याबाबत मंत्री मकरंद आबा पाटील यांनी प्रशासनाची विशेष बैठक बोलावून कामाचा आढावा घेतला. संबंधित ठेकेदाराला कामाची गती वाढवून निश्चित वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत त्यांनी मंत्रालयात ही बुधवारी मीटिंग आयोजित केली आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या भागात वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे प्रवास करताना नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे स्थानिकांनी या प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

वाई–खंडाळा–महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा वेग कायम ठेवत जनतेच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणारे मंत्री मकरंद आबा पाटील यांनी या प्रश्नावरही तत्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, रस्त्याच्या प्रश्नावर तातडीने लक्ष घालून कामाला गती देण्याचे निर्देश दिल्याबद्दल मतदारसंघातील नागरिकांनी मंत्री मकरंद आबा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket