Home » ठळक बातम्या » मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा सहभाग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा सहभाग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा सहभाग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचा कट रचण्यात आला होता. या कटात संबंधित महिला आणि कथित पत्रकार तुषार खरात हेही होते. याशिवाय गोरे यांच्या बदनामीचे व्हिडिओ तयार केल्यानंतर ते आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार तसेच माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पाठविले जात होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला.

गोरेंसारख्या एखाद्या नेत्याला आयुष्यातून उठवण्यासाठी असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे याची चौकशी होईलच. पण सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. गोरे यांच्या हिमतीची मी दाद देतो की, त्यांनी बदनामीच्या मोहिमेविरुद्ध लढा दिला. पण शरद पवार गटाचे नेते त्यांच्या बदनामीत सामील होते. यासंदर्भात त्यांचे कॉल रेकॉर्डस आहेत आणि पुरावे आहेत, असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला.विधानसभेत गेले दोन दिवस सुरु असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील वादळी चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमधील हवा काढली.

फडणवीस म्हणाले की, खरेतर गोरे यांच्याबाबतची खटला २०१९ मध्येच संपला होता. तेव्हा ते सत्ताधारी पक्षात सुद्धा नव्हते. पण हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात आले. त्यासाठी कट रचला गेला. संबंधित महिलेने प्रकरण मिटविण्यासाठी लाच मागितली होती. तिचे संभाषण ध्वनिमुद्रित केल्यानंतर पोलिसांना या लाचेची खात्री पटली आणि त्यांनी त्यांनी सापळा रचून तिला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तुषार खरात हा कथित पत्रकार आणि अनिल सुभेदार यालाही अटक करण्यात आली, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket