Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पाचगणी शहरात त्यागमूर्ती माता रमाई यांची १२९ वी जयंती सामाजिक ऐक्याच्या संदेशात साजरी

पाचगणी शहरात त्यागमूर्ती माता रमाई यांची १२९ वी जयंती सामाजिक ऐक्याच्या संदेशात साजरी

पाचगणी शहरात त्यागमूर्ती माता रमाई यांची १२९ वी जयंती सामाजिक ऐक्याच्या संदेशात साजरी

पाचगणी प्रतिनिधी :पाचगणी शहरात भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखेच्या वतीने समता सैनिक दल व पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२९ वी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा पाचगणीचे अध्यक्ष अशोकजी कदम, महासचिव महेंद्र सोनवणे (प्लाटून कमांडर, समता सैनिक दल) व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.

यावेळी नगरसेविका सौ. सुप्रिया महेश माने यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनीषा सोनवणे यांनी केले.

कार्यक्रमास दीपक घाडगे, सचिन कांबळे, प्रकाश खरात, छायाताई परिहार, आशाताई वन्ने, आशा सोनवणे, सुरेखा चव्हाण, उज्वला कदम, नीलम बाविस्कर, लता बगाडे, सुमन भोसले, भरत गायकवाड, सुनंदाताई मोरे (वंचित बहुजन आघाडी), मीना मोरे, रावजी कांबळे, विजय लोखंडे, दिनकर मोरे आदींसह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.

तसेच जयंती उत्सव मंडळ पाचगणीचे अध्यक्ष सुनीलजी बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाशभाऊ गोळे, नगरसेवक अभिलाष कराडकर, राजश्री सनस, माधुरी कासुर्डे, शिल्पा माने, सुप्रिया माने, आकाश बगाडे, स्वाती कांबळे, समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर पी.एस. सातपुते, संविधान अभ्यासक किशोरजी कांबळे, परविन मेमन, नितीन वन्ने तसेच पाचगणी पंचक्रोशीतील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात माता रमाई यांच्या सामाजिक योगदानावर बोधपर भाषणे झाली. त्यानंतर गायन कार्यक्रमाने जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अपघात की घातपात? अजित पवार विमान दुर्घटनेवर रोहित पवारांची स्फोटक माहिती,

अजित पवार यांचा अपघात नाही घातपात आमदार रोहित पवार यांनी उपस्थितीत केलेले प्रश्न मुंबई : अजित पवार यांच्या विमानाचा अपघात

Live Cricket