Home » गुन्हा » मेणवलीत कोयता, तलवारीचा धाक दाखवून केली जबरी चोरी

मेणवलीत कोयता, तलवारीचा धाक दाखवून केली जबरी चोरी

मेणवलीत कोयता, तलवारीचा धाक दाखवून केली जबरी चोरी

चार लाख 56 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने केले लंपास

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे )वाई तालुक्यात मेणवली व सटवाई कॉलनी (वाई) या दोन ठिकाणी कोयता, तलवारी, चाकू यांचा धाक दाखवून जबरी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये १५ ते २० जणांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. याबाबत वाई पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वैभवनगर, मेणवली, ता. वाई येथे शनिवारी पहाटे एकच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भूषण शरद कोचळे, रा. मेणवली यांच्या घरात प्रवेश करत सुमारे ४ लाख ५६ हजारांचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान भूषण कोचळे यांच्याशी चोरट्यांची झटापटही झाली. त्यानंतर सटवाई कॉलनी, वाई येथे लोखंडे यांच्या घरात शिरून मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे . त्यांनी आरडाओरडा केला असता चोरट्यांनी धुम ठोकली. याचा अधिक तपास सुरु असल्याचे वाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांनी सांगितले आहे. दरम्यान या घटनेने मेणवली व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा शोध तातडीने घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket