Post Views: 20
शहीद जवान युवराज व आई अनुसया पाटील प्रतिष्ठान वतीने पायी दिंडी सोहळ्यास मोफत वैद्यकीय सुविधा
तांबवे – येथील शहीद जवान युवराज पाटील व आई अनुसया प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूर आषाढी पायी दिंडी सोहळ्यास मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली यामध्ये तांबवे ,आरेवाडी, साजुर या गावातील दिंड्यांना मोफत औषध उपचार देण्यात आला .त्यावेळी डॉक्टर मिलिंद ताटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत पाटील व अन्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.गेली दहा वर्षांपासून या प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाज उपयोगी काम केली जात आहे.यामध्ये वृक्षारोपण, विद्यार्थी शालेय उपयोगी साहित्य वाटप , स्वच्छता अभियान अशी उपक्रम राबविले जातात.