अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मार्केट यार्ड गेट क्रमांक १ ते बैल बाजार रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य

मार्केट यार्ड गेट क्रमांक १ ते बैल बाजार रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य

मार्केट यार्ड गेट क्रमांक १ ते बैल बाजार रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य

कराड (प्रतिनिधी ) : मार्केट यार्ड गेट क्रमांक १ ते बैल बाजार रोडवर सध्या मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून, संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांतून होत आहे.

या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची खोली अधिक असल्याने दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविताना वाहनांचा वेग कमी करावा लागत असल्याने वाहतुकीवरही परिणाम होत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यानंतर त्यांचा अंदाज न आल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.

विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना या रस्त्यावरील खड्ड्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक व वाहनधारक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून खड्डेमुक्त रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

खड्ड्यांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहणार का? असा संतप्त सवालही वाहनधारकांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket